बंगळुरू – तीन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. फैज रशिद नावाच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याने तेव्हा फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती व आनंद व्यक्त केला होता. त्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आता त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
फैज बंगळुरूच्या कचरकनहल्ल येथील रहिवासी असून त्याला 14 फेब्रुवारी 2019 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. आरोपी कोणी अडाणी किंवा सामान्य व्यक्ती नाही. गुन्हा केला तेव्हा तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याने जाणूनबुजून फेसबुकवर पोस्ट शेअर केली आणि त्यावर टिप्पणीही केली.
परदेशातून गुजरातमध्ये येणाऱ्या हिंदूंना देणार भारताचे नागरिकत्व; केंद्र सरकारचा निर्णय https://t.co/QIMY20wlLa
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 1, 2022
शहीद झालेल्या जवानांच्या हत्येबाबत त्याने आनंद व्यक्त केला आणि तो साजराही केला. तो भारतीय नसल्यासारखेच त्याने हे कृत्य केले. त्याचे हे कृत्य आणि गंभीर आणि राष्ट्रविरोधी आहे असे त्याला शिक्षा ठोठावताना न्यायालयाने म्हटले आहे. फैजचा मोबाइल जप्त करण्यात आला असून न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून आता त्याची तपासणी केली जाते आहे.