पुणे – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील 5 हजार 900 करोनाबाधित बरे होऊन घरी गेले. विभागात रुग्णांची संख्या 10 हजार 704 झाली आहे. तर ऍक्टिव रुग्ण 4 हजार 305 आहे. 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 8 हजार 303 बाधित रुग्ण असून 4 हजार 921 बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव रुग्ण संख्या 3 हजार 10 आहे. 372 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 194 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यात 569 रुग्ण असून 230 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ऍक्टिव रुग्ण संख्या 322 आहे. करोनामुळे एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 80 रुग्ण असून 463 बाधित बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव रुग्णसंख्या 524 आहे. 93 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात 122 रुग्ण असून 68 बाधित बरे होवून घरी गेले आहेत. तर ऍक्टिव रुग्ण संख्या 50 असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 630 रुग्ण असून 225 बाधित बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव रुग्णसंख्या 399 आहे. 6 जणांचा मृत्यू झाला आहे.