नवी दिल्ली – देशात पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणूकाच्या तारखा जाहीर झाल्या आहे. गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (CEC) यांनी याबद्दल निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची तपशीलवार माहिती दिली.
जवळपास या निवडणुकांसाठी 690 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. हे सर्व होत असताना देशात कोरोनाचे आव्हान असणार आहे.“यकीन हो तो कोई रास्ता निकलता है हवा की ओट की ख़िलाफ़ भी दिया जलता है।” कोरोना महामारी से निकलेंगे हमे यकीन है! या शायरीच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्वा आव्हांनाचा सामना करत निवडणूका घेतल्या जातील असं स्पष्ट केलं.
#WATCH Live: Election Commission of India announces Assembly polls schedule for Goa, Punjab, Manipur, Uttarakhand & Uttar Pradesh https://t.co/c9oDf6AdJd
— ANI (@ANI) January 8, 2022
ओमिक्रॉन या नव्या व्हेरीअंटमुळे कोविडची प्रकरणं वाढत असल्यानं, निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिव आणि गृह सचिव, तज्ञ आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत.
१५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाइक रॅली आणि मिरवणुकांना परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत.
राज्य आणि निवडणूका
उत्तर प्रदेश-10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान
पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारी या कालावधीत मतदान
मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान
सर्व पाच राज्यांची मत मोजणी 10 मार्च रोजी होईल.