पाकिस्तानवर नजर ठेवणार 5 उपग्रह

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि तिथे सुरू असणाऱ्या दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी इस्रो तयारी करत आहे. पुढील 10 महिन्यांमध्ये ते 8 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणार आहेत. यातील 5 कृत्रिम उपग्रह हे देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. या 5 उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरीज आणि 4 रीसॅटचे उपग्रह आहेत. तर अन्य तीन उपग्रह हे जीसॅट सिरीजमधील आहेत.

जीसॅट उपग्रहांचा उपयोग कम्युनिकेशन म्हणजेच संचार क्षेत्रात केला जातो. तसेच सैन्य दलांच्या संभाषण आणि संपर्कासाठी सुरक्षित प्रणालीची आवश्‍यकता असते. त्यामुळे या उपग्रहाचा वापर सैन्य दलांसाठी करता येऊ शकतो. फेब्रुवारी 2020 पर्यंत हे उपग्रह लॉंच करण्यात येण्याची शक्‍यता आहे. पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईक वर रीसॅट आणि कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. रीसॅटच्या मदतीने अंतराळातून थेट जमिनीपासून तीन फूट उंचीपर्यंतचे चांगले फोटो काढता येतात. तर कार्टोसॅट इतके प्रगत तंत्रज्ञान आहे की त्यामधून जमिनीवरील अवघ्या एक फुटावरील फोटो घेता येतात. याचाच एक भाग म्हणून गेल्या सहा महिन्यांत असे तीन उपग्रह सोडण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.