“एसईबीसी’, “ईडब्लूएस’ प्रवर्गातील उमेदवारांना होणार लाभ
पुणे – सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) व खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्लूएस) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी 5 टक्के गुणांची सूट प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे या उमेदवारांना आता उत्तीर्ण होण्यासाठी 60 टक्के ऐवजी 55 टक्के गुण मिळवावे लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारी रोजी राज्यात “टीईटी’ची परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी एकूण 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 687 तर पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 जणांनी नोंदणी केली होती.
“एसईबीसी’ व “ईडब्लूएस’च्या प्रवर्गासाठी उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी या संबंधित प्रवर्गातील उमेदवारांनी शासनाकडे व परीक्षा परिषदेकडे केली होती. त्याची दखल घेत शासनाने मागणी मान्य करत निर्णयही जारी केला आहे. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी उमेदवारांसाठी पत्र काढले आहे.
अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, अपंग या प्रवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी 60 टक्के गुण मिळविणे गरजेचे आहे. आता नव्याने “एसईबीसी’ व “ईडब्लूएस’च्या प्रवर्गासाठीही उत्तीर्ण होण्याच्या गुणांमध्ये सूट दिली आहे. या उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनवरून माहिती व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 23 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
“टीईटी’ परीक्षा अर्ज भरताना संबंधित जात प्रवर्ग नोंद घेण्यात आलेली नाही तसेच नावातील स्पेलिंग बदल करणेबाबत उमेदवारांकडून निवेदन प्राप्त होत आहेत. हे बदल करण्यासाठी महाटेटच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली आहे.
नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एस.एस.सी. प्रमाणपत्र तर जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र करणे आवश्यक आहे. इ-मेल, फोनसंदेश, लेखी पत्र याद्वारे आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करून परीक्षेचा निकाल लावण्यात येणार आहे, असेही सुपे यांनी स्पष्ट केले आहेत.
EWS chi ky ky conditions astat
Sir jul 2019 tet exam la 87 marks alet open category tari results fail ka