पुणे – दहीहंडी उत्सवात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील 5 दहीहंडी मंडळांवर पोलिसांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. त्यात फरासखाना पोलीस ठाणे 2, कोथरुड, कोरेगाव पार्क, येरवडा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच, तेथील साऊंड सिस्टिम जप्त केली आहे.
नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणावर स्पीकरचा आवाज ठेवल्याने कोरेगाव पार्क पोलिसांनी एका मंडळावर गुन्हा दाखल केला असून ध्वनीवर्धक यंत्रणा पोलिसांनी जप्त केली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याविषयीच्या अटीवर परवानगी देण्यात आली होती. परंतु, अटीचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली.