‘एएन-32 ‘ विमानाची माहिती देणाऱ्यास वायुदलाकडून ५ लाखांचे बक्षीस

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग जिल्ह्यातल्या मेंचुका डोंगराळ भागातून बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या मालवाहू विमानाचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरुच राहिला. आतापर्यंत 2 “सुखोई-30′ आणि 2 “”सी-130जे’ यांच्यासह “एएन-32′ विमाने, 2 “एमआय-17′ हेलिकॉप्टर आणि 2 “एएलएच’ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या विमानाचा शोध घेतला जात आहे.

लष्कर, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि राज्य पोलिस दलांकडून जमिनीवरही या विमानाचा शोध घेतला जात आहे. अद्यापही या बेपत्ता विमानाचा शोध लागलेला नाही. हवाई दलाने या विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.

शिलाँगमध्ये संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर मार्शल आर. डी. माथूर, AOC इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकावर देता येईल असं ही विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी म्हटलं आहे. विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.