नागपूर – वर्ध्यात एका हॉस्पिटलच्या आवारात काही महिन्यांपूर्वी अर्भकाच्या कवट्या आणि हाडं सापडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नागपूरमध्ये कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पाच अर्भक आढळून आल्याने पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावून गेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील लखडगंज भागात ही घटना उघडकीस आली आहे. केटी वाईन शॉप्सजवळील कचरा डंपिंग यार्डमध्ये बुधवारी सायंकाळी पाच अर्भकं आढळली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
ही अर्भक काही स्थानिकांनी दिसले आणि त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. सूचनांवर त्वरीत कारवाई करत लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचही अर्भक ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.