5 Days Working in Bank: डिसेंबर महिन्यापासून बँका फक्त 5 दिवस सुरू राहतील का? कोट्यवधी बँक ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांच्या मनात हा मोठा प्रश्न आहे. बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून बँकांमध्ये 5 दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. तथापि, 2 शनिवार कमी करण्यासोबत, प्रत्येकाला बँकांमध्ये दररोज 40 मिनिटे जादा काम करावे लागेल. बँक कर्मचारी संघटना, आरबीआय आणि सरकारी अधिकारी यांच्यात बँकांमध्ये 5 दिवस काम करण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात याबाबत निर्णय होणार आहे.
बँकांचा आठवडा 5 दिवस करण्याचा प्रस्ताव काय?
आतापर्यंत देशातील बँका सर्व रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. सध्या बँकांना एक शनिवार वगळता सुट्टी मिळते. म्हणजे एका शनिवारी काम करायचे आणि दुसऱ्या शनिवारी काम बंद. आता बँक कर्मचारी आणि बँक युनियन अनेक दिवसांपासून आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा आग्रह धरत आहेत. म्हणजेच सोमवार ते शुक्रवार बँकांमध्ये काम असेल आणि सर्व शनिवार आणि रविवार बँका बंद राहतील. म्हणजेच बँक कर्मचारी एका महिन्यात 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्यांची मागणी करत आहेत. यासाठी बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात करार झाला आहे.
बँक उघडण्याची आणि बंद करण्याची ही नवीन वेळ असेल?
वृत्तानुसार, सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास बँकिंग तास 40 मिनिटांनी वाढवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेच्या शाखा सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सध्या बहुतांश बँका 10 वाजता सुरू होतात. आणि दुपारी 4 वाजेपर्यंत सार्वजनिक व्यवहार चालतात. 5 दिवसांच्या कामकाजाच्या अंमलबजावणीचा ग्राहक सेवेवर परिणाम होणार नाही, असे आश्वासन युनियनने दिले आहे. बँक कर्मचाऱ्यांचे कामाचे तास दररोज सुमारे 40 मिनिटांनी वाढवले जातील असे सांगितले जात आहे.
दरम्यान, मार्च 2024 मध्ये IBA आणि बँक युनियन यांच्यात आठवड्यातून 5 दिवस काम करण्याच्या प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तथापि, बँका फक्त 5 दिवसांसाठी उघडतील, यासाठी अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची परवानगी आवश्यक आहे.
डिसेंबरपासून बँकांमध्ये पाच दिवसांचे काम सुरू होणार का?
बँक कर्मचाऱ्यांची 5 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची मागणी डिसेंबरमध्ये पूर्ण होणे कठीण आहे. यावर नाराजी व्यक्त करत ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने (एआयबीओसी) लवकरच आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
एआयबीओसीचे सरचिटणीस रुपम रॉय यांनी सांगितले की, आतापर्यंत 5 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. आम्ही आमच्या सर्व सहयोगी संघटना आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. एआयबीओसीने सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाला या प्रस्तावाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. युनियनने म्हटले आहे की हे केवळ कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक नाही तर बँकिंग क्षेत्राच्या कामकाजाचा स्तर देखील सुधारेल.