मोहाली – पंजाबमधील डेरा बस्सी येथील एक 88 वर्षीय इसम 5 कोटी रुपयांची लॉटरी लागल्याने तो आयुष्याच्या अखरेच्या टप्प्यात एकाएकी करोडपती बनला आहे. डेराबस्सी येथील त्रिवेदी कॅम्पचे रहिवासी महंत द्वारका दास यांनी पंजाब सरकारची लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी जिंकली त्यामुळे त्यांचे जीवनच पूर्णपणे बदलून टाकले आहे.
ही बातमी सार्वजनिक झाल्यानंतर, त्यांच्या परिसरात आनंदोत्सव सुरू झाला आणि लोक त्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि हार घालण्यासाठी त्याच्या घरी गर्दी करू लागले आहेत. गेले सुमारे 35-40 वर्ष ते नियमीतपणे लॉटरी तिकीट घेत होते. पण अखेर त्यांचे हे प्रयत्न फळाला आले आहेत.
पाच कोटी रूपयांच्या रकमपैकी कर कपात करून त्यांना साडे तीन कोटी रूपये मिळणार आहेत. लॉटरी रकमेच्या एकूण 30 टक्के रक्कम कर म्हणून कापून घेतली जाणार आहे.पंजाब राज्य लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी 2023 चे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले होते.