पुणे – महापालिकेतील 5 विद्यमान नगरसेवक यंदा विधानसभेची पायरी चढणार आहेत. त्यात भाजपच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, नगरसेवक सुनील टिंगरे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 नगरसेवक एकाचवेळी विधानसभेची पायरी चढणार आहेत. 2014 मध्ये महापालिकेच्या नगरसेवकपदी असलेले योगेश टिळेकर हडपसरमधून तर, कोथरूडमधून प्रा. मेधा कुलकर्णी यांची विधासभेवर वर्णी लागली होती; तर 2009 मध्ये पर्वतीमधून माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर आणि चंद्रकांत मोकाटे विधानसभेत गेले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच एकाचवेळी 5 नगरसेवक विधानसभेची पायरी चढणार आहेत.