काबूल – अफगाणिस्तानमध्यो देशातल्या देशात किमान 55 लाख जण विस्थापित झाले असल्याचे “इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले आहे. गेल्या 8 महिन्यांच्या अवधीमध्ये अफगाणिस्तानात 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे विस्थापन झाले आहे, तर इराण आणि पाकिस्तानातून 8 लाख 50 हजारांपेक्षा अधिक नागरिक परत आले आहेत, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
इराणच्या सीमेवर किमान 3 हजार अफगाणी नागरिक गेल्या 8 दिवसांपासून अडकून पडले आहेत. सीमा बंद असल्याने त्यापैकी अनेकांना अफगाणिस्तानात अन्य भागांमध्ये विस्थापित व्हावे लागते आहे. दारिद्य्र, रोजगाराच्या संधी नसणे आणि असुरक्षिततेला कंटाळून या नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विस्थापितांनी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी तालिबान सरकार प्रयत्नशील आहे. आता अफगाणिस्तान सुरक्षित देश आहे. आता कामाच्या संधी आणि वाणिज्यविषयक प्रगतीवर लक्ष केंद्रित केले जात आहे, असे तालिबानी मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.