वायनाडमध्ये रंगणार ‘४ जी’ सामना : निवडणुकीच्या रिंगणात चार गांधी

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढविणार आहेत. राहुल गांधी यांनी गुरुवारी वायनाड मतदासंघातून उमेदवारी दाखल केली. परंतु, वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविणारे राहुल गांधी एकमात्र नसून तर त्यांच्याच विरोधात आणखीन तीन गांधी रिंगणात आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आव्हान देणाऱ्या राहुल गांधीचे पूर्ण नाव केई राहुल गांधी आहे. ३३ वर्षीय केई राहुल हे कोट्टायमचे रहिवासी आहेत. आणि अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. निवडणूक आयोगामध्ये दिलेल्या माहितीनुसार, केई राहुल यांचे शिक्षण एम. फिल. झाले असून ते सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांच्याकडे केवळ पाच हजार रुपये कॅश आणि ५१५ रुपये बँक अकाउंटमध्ये आहेत.

याव्यतिरिक्त आणखी दोन गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना टक्कर देणार आहेत. राघुल गांधी आणि एम शिवप्रसाद गांधी अशी अन्य दोन उमेदवारांची नावे आहेत. राघुल गांधी मूळचे कोयंबटूरमधील रहिवासी असून एक पत्रकार आहेत. व ‘अगिला इंडिया मक्कल कझगम पार्टी’चे ते उमेदवार आहेत. तर शिवप्रसाद गांधी संस्कृत शिक्षक असून ते अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.