49 वर्षांपूर्वी प्रभात: अणुशक्‍ती शांततामय कार्यासाठीच वापरणार!

ता. 3, माहे मे, सन 1972

ना. जगजीवनराम यांचा निर्धार
नवी दिल्ली, दि. 2 -“शांतिपूर्ण कार्यांसाठी’ जमिनीखाली अणुस्फोट करण्यासंबंधी अणुशक्‍ती मंडळ अभ्यास करीत आहे, असे आज संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी लोकसभेत सांगितले. भारताने अण्वस्त्रे बनवावीत या जोरदार मागणीला त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, “”अणुशक्‍ती शांततामय कार्यासाठीच वापरली जाईल.”

ते म्हणाले, “”तंत्रशास्त्र आणि विज्ञान यात प्रगति करणे, हाच देशाच्या षंरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. अणुशक्‍तीच्या क्षेत्रांत प्रगति केलेल्या देशात भारताला वरचे स्थान आहे.”

पाकिस्तान पुन्हा शस्त्रसज्ज होत आहे. त्याबाबत ते म्हणाले की, शिखर बोलावण्यापासून दुसरीकडे लक्ष वळविणे योग्य होणार नाही. शिखर बोलावण्याने भारत, पाकिस्तान व बांगला देश या तीनही देशांतील जनतेचे हित होणार आहे.

अर्थसंकल्पातील हस्तदोष दूर करण्यास मंजुरी
पुणे – “”महापालिका कार्यक्रम पत्रिकेवरील हस्तदोषामुळे झालेल्या नियमबाह्य चुका व दोष नगरसचिवांच्या दृष्टोत्पत्तीस आले तर त्यांना महापौरांचे नजरेस आणता येते व महापौरच त्यातील हस्तदोष दूर करू शकतात.” या मनपा कलम 95 च्या आधाराने शिक्षण मंडळाच्या अर्थसंकल्पातील हस्तदोष दूर करण्यास सभागृहाने मंजुरी दिली.

शिक्षण समितीचा मूळ 168 लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीने 125 लक्षाचा केला होता. परंतु मूळचा दोष तसाच राहून सर्वसाधारण सभेंत ठराव आल्यावर हस्तदोष लक्षात आल्यावर ही दुरुस्ती झाली.

आजची कार्यक्रमपत्रिका डिसेंबर 71 ची होती. डेक्‍कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स या संस्थेवर सभागृहाने वि. दा. ढोले पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.