17 दिवसांचे इस्रायल-अरब युद्ध थांबले
इस्रायल-अरबचे गेले 17 दिवस चाललेले युद्ध थांबविण्याविषयी राष्ट्रसंघाने केलेला ठराव इस्रायल आणि इजिप्तने स्वीकारला आहे. सीरियाने याबाबत मौन धारण केले आहे. तर इराकला ठराव मान्य नाही. पण इराकची भूमिका युद्धबंदीच्या आड येणार नाही, अशी अपेक्षा आहे. लिबियानेही ठराव फेटाळून लावला आहे.
युद्धबंदीचे भारताकडून स्वागत
नवी दिल्ली, दि. 22 – पश्चिम आशियातील युद्धबंदीसाठी सुरक्षा मंडळाने केलेल्या ठरावाचा इस्रायल व इजिप्त यांनी स्वीकार केल्याबद्दल भारताने दोन्ही देशांचे स्वागत केले आहे.
आजपासून दुधाचा संपूर्ण कोटा… पण
पुणे – सरकारी दूध पुरवठ्यात सुधारणा झाल्यामुळे कार्डधारकांना त्यांच्या कार्डावरील दुधाचा पूर्ण कोटा देण्यात येणार आहे. मात्र जास्तीतजास्त तीनच बाटल्या दिल्या जाणार आहेत.
स्वायत्त महाविद्यालयाच्या कल्पनेस प्रतिसाद नाही!
पुणे – सध्याच्या महाविद्यालयात शिक्षण व विद्यापीठातर्फे परीक्षा, ही पद्धती बदलून स्वायत्त महाविद्यालये स्थापन करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचनेला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल डॉ. सतीशचंद्र उपाध्यक्ष- विद्यापीठ अनुदान मंडळ यांनी खेद व्यक्त केला.
शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे, असे सांगून डॉ. सतीशचंद्र म्हणाले की, स्वायत्त महाविद्यालयासाख्या विषयावर महाराष्ट्रातून अद्याप एकही विद्यापीठ तयार झालेले नाही.
13500 टन गहू घेऊन रशियन जहाज आले
विशाखापट्टण – रशियाकडून मिळणाऱ्या दहा लाख टन गव्हापैकी 13500 टन गहू घेऊन आलेले एक जहाज आज विशाखापट्टण बंदरात आले. रशियाने हा गहू ऑस्ट्रेलियाकडून खरेदी केला असून तो भारताकडे पाठविण्यात आला आहे.