भारताच्या तेलपुरवठ्यात कपात करणार नाही
बैरूत, दि. 19 – भारत हा अरब राष्ट्रांचा मित्र असल्याने भारताला अरब राष्ट्रांकडून होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात कपात करण्यात येणार नाही, असे आज सौदी अरेबियाने जाहीर केले. रियाध स्टेट रेडिओवरून घोषित करण्यात आलेल्या निवेदनात भारताला करण्यात येत असलेल्या
तेलाच्या निर्यातीमध्ये कपात केली नसल्याने म्हटले आहे. या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, इस्रायलने व्यापलेल्या अरबांच्या प्रदेशासाठी झालेल्या लढाईत भारताने न्यायबुद्धीने अरबांची बाजू घेतली होती.
इजिप्शियनांनी आपलीच 40 विमाने पाडली
न्यूयॉर्क – रशियाची सॅम 6 जातीची प्रक्षेपणास्त्रे नीट हाताळता न आल्यामुळे परवाच्या युद्धात इजिप्शियनांनी आपलीच 40 विमाने खाली पाडली. असे वृत्त न्यूजवीकने दिले आहे. एकूण 120 विमाने इजिप्तने युद्धांत गमावली. त्यात इराकने 12 गमावली, पण पैकी रशियन प्रक्षेपणास्त्रांनाच बळी पडली.
होमिओपॅथी शास्त्रास सरकारने मदत द्यावी लोकसभेत मागणी
नवी दिल्ली – होमिओपॅथी वैद्यक शास्त्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारने भरपूर मदत पुरवावी, अशी मागणी आज अनेक खासदारांनी लोकसभेत केली. होमिओपॅथी वैद्यकशास्त्र ग्रामीण विभागातील लोकांसाठी स्वस्त व परिणामकारक आहे, असेही मत या खासदारांनी मांडले. प्रत्येक राज्यात किमान एक होमिओपॅथी कॉलेज स्थापन करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.