जिल्ह्यात दिवसात 11 जनावरांचा मृत्यू
सातारा – जिल्ह्यात लंपी स्किन आजारामुळे शुक्रवारी 11 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 597 पशुधन मृत झाले आहे. 180 गावांमध्ये लंपी स्किनची लागण झाली आहे. आजअखेर 8 हजार 996 जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव झाला.
4794 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली. लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय आणि तालुका लघु पशुचिकित्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. जिल्ह्यात 3 लाख 54 हजार 56 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.