पाकिस्तानमध्ये 47 प्राध्यापकांना अटक

कराची: पाकिस्तानच्या शासकीय महाविद्यालयात पदोन्नतीस होणाऱ्या दिरंगाईमुळे त्रस्त असलेल्या सिंधच्या मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निषेध नोंदवणाऱ्या किमान 47 प्राध्यापक आणि व्याख्याते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉन न्यूजने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर सांगितले की, “अटक प्राध्यापकांपैकी ४४ पुरुष आणि ३ महिला आहेत. यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात हलविण्यात आले.”

निषेध करणार्‍या प्राध्यापकांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या मागण्या सिंधूचे माजी मुख्यमंत्री सय्यद कैम अली शाह यांनी मंजूर केल्या आहेत, परंतु असे असूनही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही, यामुळे त्यांना निषेध करण्यास भाग पाडले जात आहे.

सिंध-व्यापी निषेधाचा एक भाग म्हणून, कराची येथील डॉ. जीउद्दीन अहमद रोड येथे झालेल्या निदर्शनात सुमारे २००-२५० प्राध्यापकांनी भाग घेतला. हा निषेध सिंध प्राध्यापक व व्याख्याते असोसिएशन (सीपीएलए)च्या अंतर्गत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.