भाटघरला वीजउत्पादन केंद्र
मुंबई, दि. 23 – पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन वीज उत्पादन केंद्राच्या विद्युत गृहासंबंधीची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. यंत्रणेच्या पायाचे कॉंक्रीटीकरण प्रगतीपथावर आहे. तसेच पाणचक्कीचे ड्राप्ट ट्यूबस् स्पायरल यांची उभारणी झाली आहे. पाणचक्की आणि जनित्र यांच्या जोडणीचे काम सध्या चालू आहे. ह्या वीजकेंद्राची उभारणी ऑक्टोबर 1976 मध्ये पूर्ण होईल.
समान वेतन धोरण
नवी दिल्ली – केंद्रीय व राज्य सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन धोरण सान ठेवण्याबाबत सरकार विचार करील, असे राज्यसभेत अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.
कोल्हापूरला दूरचित्रवाणी केंद्र नाही
मुंबई – कोल्हापूरजवळ पन्हाळा येथे दूरचित्रवाणीचा मनोरा उभारता येणे शक्य नाही, असे माहिती खात्याचे राज्यमंत्री शामराव कदम यांनी विधानसभेत सांगितले. केंद्राकडे दूरचित्रवाणी केंद्रासाठी कोल्हापूरची शिफारस केलेली नाही.
18 मीटर लांबीची बस
फ्रांकफुर्ट – मोटार-प्रदर्शनात स्ट्रुटगार्ट येथे तयार झालेली एक प्रचंड बस हा एक नवाच प्रकार म्हणावा लागेल. तिची लांबी 18 मीटर असून उंची 4 मीटर व रुंदी अडीच मीटर आहे. या दुमजली बसमध्ये 144 उतारुंची बसण्याची व्यवस्था असून आणखी 40 जणांची उभे राहण्याची सोय असून किंमत 5 लक्ष मार्क आहे.