कुटुंब नियोजनासाठी नवा संमिश्र कार्यक्रम
नवी दिल्ली, दि. 6 – देशात लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे तिला आळा घालावा व लोकांनी कुटुंब नियोजनाचा मार्ग अनुसरावा म्हणून केंद्रीय आरोग्य खात्याने एक नवा संमिश्र कार्यक्रम आखला आहे. कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे. आरोग्य खात्याचे राज्यमंत्री जगदंब प्रसाद यादव यांचे नेतृत्वाखाली एक पाथक आग्नेय आशियाचा दौरा करून परतले आहे. त्यांचे मते, सरकारी प्रयत्न व स्वयंसेवी संघटना यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत तरच कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वी होईल.
तर औषधविषयक धोरणाचा फेरविचार करू
मुंबई – संरक्षण मंत्री जगजीवनराम यांनी सांगितले की, नवे औषधविषयक धोरण जर जनतेला हितकारक ठरत नसेल तर त्याचा फेरविचार करावा लागेल. औषध विषयक धोरण औषधी उद्योग धंद्यास पोषक ठरले पाहिजे, असेही राम म्हणाले.
कापडावरील जकातवाढ रद्द करण्याची मागणी
पुणे – 1 जूनपासून पुण्यात कापडावरील जकात 2 टक्क्यांऐवजी 3 टक्के करण्यात आली आहे. या जकातवाढीचा परिणाम म्हणून कापडाचे भाव वाढणार असून तो बोजा जनतेवर पडणार. जकात वाढल्याने कापडाचा व्यापार कमी होईल, तरीही जकातवाढ रद्द करावी, अशी मागणी आहे.