पुणे – शहराला पाणीपुरठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, आज सांयकाळी 6 वाजता पुन्हा खडकवासला धरणातून मुठा नदीत 45 हजार 474 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कार्यालयाने दिली आहे तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
#UPDATE District Information Office, Pune: 45474 cusec of water will be released from Khadakwasla Dam in Mutha river at 6.00 pm today. #Maharashtra https://t.co/QZlpapDBX5
— ANI (@ANI) August 4, 2019