450 कोटी रुपये मानधन घेणारा ‘बॉन्ड’

जेम्स बॉन्ड सिरीजमधील पुढचा सिनेमा लवकरच येतो आहे. “बॉन्ड 25′ नावाच्या या बॉन्डपटात डॅनिएल क्रेग पुन्हा एकदा जेम्स बॉन्ड साकारणार आहे. या सिनेमासाठी डॅनिएल क्रेगने आतापर्यंत कोणत्याही हॉलिवूड ऍक्‍टरने घेतले नसतील एवढे प्रचंड मानधन घेतल्याची चर्चा आहे. “बॉन्ड 25’च्या निर्मात्यांकडूनही डॅनिएलला प्रचंड मानधनावर या सिनेमासाठी साईन केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने या सिनेमासाठी तब्बल 50 दशलक्ष पौंड म्हणजेच जवळपास 450 कोटी रुपये इतके भरमसाठ मानधन घेतले आहे. विशेष म्हणजे डॅनिएल क्रेग या सिनेमाचा एक्‍झिक्‍युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही असणार आहे. म्हणजे अर्थातच सिनेमाच्या फायद्यामध्येही त्याचा वाटा असणार आहे. “बॉन्ड 25’च्या निमित्ताने डॅनिएल क्रेग पाचव्यांदा जेम्स बॉन्ड पडद्यावर साकारणार आहे. डॅनिएल क्रेगने साकारलेल्या “स्पेक्‍ट्रम’ या बॉन्डपटासाठी त्याला 37 दशलक्ष पौंड म्हणजे 333 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. “बॉन्ड 25’च्या मानधनाच्या रकमेचा विचार करता ही रक्कम हॉलिवूडमधील कोणत्याही बड्या कलाकाराने एकाच सिनेमासाठी घेतलेल्या मानधनापेक्षा सर्वाधिक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॅनिएल क्रेगच्यापूर्वी बॉन्ड साकारणाऱ्यांपैकी पीअर्स ब्रोस्नन हा सर्वाधिक यशस्वी जेम्स बॉन्ड ठरला होता. त्याने चार बॉन्डपट केले होते आणि 13 दशलक्ष पौंड म्हणजे 117 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. गेल्यावर्षी निधन झालेल्या रॉजर मूरनी 7 बॉन्डपटांमध्ये जेम्स बॉन्डचा रोल केला होता. हे सर्व सिनेमे सुपरहिट झाले होते. त्यांनी 17 दशलक्ष पौंड म्हणजे 154 कोटी रुपये मानधनापोटी घेतले होते. त्यानंतर डिमोथी डाल्टनने दोन बॉन्डपटांसाठी 36 कोटी रुपये, जॉर्ज लेजनबीने एका बॉन्डपटासाठी सर्वात कमी म्हणजे 72 हजार पौंड म्हणजे 64 लाख रुपयांचे मानधन घेतले होते.
यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात “बॉन्ड 25’च्या प्रॉडक्‍शनचे काम सुरू होणार आहे. पूर्ण 5 महिने डॅनिएल या सिनेमाच्या शुटिंगसाठी उपलब्ध असणार आहे. बॉन्डपटामध्ये असतो तो ऍक्‍शन, ट्रीक, रोमान्स, सेक्‍स आणि चेस सिक्‍वेन्सचा सर्व मालमसाला या नव्या बॉन्डपटामध्ये ठासून भरलेला असणार आहे. वर्षभराच्या प्रॉडक्‍शन वर्कनंतर पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा बॉन्डपट रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)