पुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

राज्यात युतीला 45 जागा हमखास

कोल्हापूर / प्रतिनिधी : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूने अनुकूलतेचा संदेश देणारा अखंड महाराष्ट्रात वातावरण निर्माण करणारा २४ मार्चचा तपोवनातील विराट मेळावा रेकॉर्डब्रेक असेल. ही सभा महाराष्ट्रातील सर्वात उच्चांकी सभा असेल. महाराष्ट्रात यूतीला लोकसभेमध्ये 45 जागा मिळतील असा विश्वास पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. कागल येथे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

पुढचा बॉम्ब खूपच मोठा असल्याचा गौप्यस्फोट करून पालकमंत्री पाटील म्हणाले सगळे बॉम्बे फोडून झाल्यावर मी मतदारसंघात बसून असणार आहे.  प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणार हे कांही नवीन नाही. आजचा समाज  सेलिब्रिटीना मत द्यायला नाही, बघायला येतो. नाहीतर देशाचे पंतप्रधान हेमामालिनी झाल्या असत्या. शिवसेनेचे धनुष्यबाण लोकांच्या घराघरात पोहोचवून राज्यात विक्रमी मतांनी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचा चंग बांधूया.  बाळासाहेब ठाकरे  करवीरनगरीच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करायचे ही आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, गेल्या वेळच्या निवडणुकीत प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी आणि जनजागृतीसाठी मिळालेला अपुरा वेळ यामुळे निसटत्या  पराभवाला सामोरे जावे लागले. पण यावेळी सेनेचे सहा आमदार, भाजपचे दोन आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचे पाठबळ असल्यामुळे ही निवडणूक जिंकणे फार सोपे झाले आहे. जनतेनेच ही निवडणूक  हातात घेतले आहे. राजकारणाचे विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातून या निवडणुक निकालाने जिल्ह्यात राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. कागलकरांनी ऐक्याचे दर्शन घडवावे. लोकसभेतील मताधिक्यासाठी सर्वच तालुक्यांमध्ये इर्षा सुरू आहे. यामध्ये कागलकर ताकद दाखवून देऊया.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)