पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी 400 पेक्षा अधिक करोना बाधित आढळून आले असून, तीनही दिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मागील चोवीस तासांमध्ये 430 नवीन रुग्ण आढळले असून, बरे झालेल्या 382 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. समाधानाची बाब अशी की, रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण स्थिर असून मागील 24 तासांत तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 317 झाली असून, त्यापैकी 1 हजार 93 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 403 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 248 व्हेंटिलेटरवर आहेत.
आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाख 68 हजार 460 झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 694 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 4 हजार 449 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आज 3 हजार 645 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्या संख्येनेही आठ लाखांचा आकडा ओलांडला आहे.