43% नवनिर्वाचीत खासदार गुन्हेगारी प्रवृत्तीचे

नवी दिल्ली – 17व्या लोकसभेत निवडून आलेल्या एकूण खासदारांपैकी निम्म्याच्या आसपास खासदार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. हे प्रमाण 2009च्या तुलनेत 101% टक्‍क्‍यांनी वाढले आहे. लोकसभेच्या 539 नवनिर्वाचीत खासदारांपैकी 233 जणांवर (43%) विविध प्रकारे गुन्हेगारीचे प्रकरणे दाखल आहेत.

याबाबतचा अहवाल एडीआर (Association of Democratic Reforms) या संस्थेने प्रकाशित केला आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खासदारांमध्ये भाजपचे 116, कॉंग्रेसचे 29, जेडीयुचे 13, डीएमकेचे 10 आणि टीएमसीच्या 9 जणांचा समावेश आहे. नव्याने निवडून आलेल्या 29 टक्‍के प्रतिनिधींवर बलात्कार, हत्या, हत्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल आहेत. हे प्रमाण 2014च्या तुलनेत 26% टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 11 जणांमध्ये भाजपचे पाच, बसपचे दोन, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वायएसआर कॉंग्रेस आणि अपक्ष यांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.यात भोपाळ लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर 2008मध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच 29 जणांवर वादग्रस्त वक्‍तव्य केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, 2014मध्ये 34 टक्‍के म्हणजे 185 प्रतिनिधींवर गुन्हेगारीचे प्रकरणे दाखल होते, तर 112 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. हेच प्रमाण 2009मध्ये 30 टक्‍क्‍यांवर होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.