केनियात सापडले 42 लाख वर्षांपुर्वीच्या माकडाचे जिवाश्‍म

नैरोबी – केनियातील संशोधकांना तब्बल 42 लाख वर्षांपूर्वीच्या आणि अवघ्या एक किलो वजनाच्या चिमुकल्या माकडाचे जीवाश्‍म शोधण्यात यश मिळाले आहे. ही जगातील सर्वात छोटी माकडांची प्रजाती असून तिचे नाव “नॅनोपीथेकस बाऊनी’ असे ठेवण्यात आले आहे. सध्या हे जीवाश्‍म नैरोबीमधील म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे. सध्याचे टॅलापोईन आपल्या पूर्वजांच्या तुलनेत अधिक छोटे बनले आहेत. दलदलीच्या क्षेत्रात ते राहत असल्याने त्याचाही हा परिणाम आहे.

ज्या माकडाचे हे जीवाश्‍म सापडले आहे ते सध्याच्या जगातील सर्वात लहान आकाराच्या “टॅलापोईन’ माकडासारखेच आहे. एके काळी केनियाच्या वाळलेल्या गवताच्या मैदानांमध्ये ही माकडे वावरत होती असा कयास या शास्त्रज्ञांकडून लावण्यात आला आहे. केनिया नॅशनल म्युझियम, ड्यूक आणि मिसोरी युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

केनिया नॅशनल म्यूझियमचे फेड्रिक कयालो यांनी सांगितले की, 42 लाख वर्षांपूर्वीचे हे माकडाचे जीवाश्‍म पर्यावरणात आणि हवामानात किती बदल झाले हे दाखवते. या बदलाचा परिणाम नॅनोपिथेकस बाऊनी आणि टॅलापोईन या दोन्ही प्रजातींवर झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)