बेशिस्त महाभागांनी थकविले 29 कोटी

10 लाख प्रकरणे : वाहतूक पोलीस रक्कम वसूल करणार

– गणेश राख

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जाते. यात ऑनलाइन तसेच ई-चलनाद्वारे दंड आकारून तो वसूल केला जातो. पण, अशा बेशिस्त वाहतूक करणाऱ्या पुणेकरांकडे थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 29 कोटी रुपयांची थकबाकी झाल्याचे समोर आले आहे. आता ती वसूल करण्याचे “टार्गेट’ पोलिसांना देण्यात आले आहे.

वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी शहरातील अनेक चौकांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर याद्वारे कारवाई करुन त्यांना ऑनलाइन दंड केला जातो. तर, वाहतूक पोलीसही गाडी अडवून नियमभंग करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे कारवाई करतात. त्याचवेळी दंड भरण्यास सांगितले जाते. यावेळी वाहनचालकाकडे पैसे नसल्यास त्यावर दंड आकारुन रक्कम नंतर भरण्याची मुभाही देण्यात येते. मात्र, काही महाभाग दंडच भरत नाहीत.

चौकांची संख्या पाहता प्रत्येक ठिकाणी पोलिसाची नेमणूक अशक्‍य आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. ते थेट वाहतूक नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत. यामुळे तत्काळ कारवाई शक्‍य होते. एप्रिल-2017 पासून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाच्या नंबर प्लेटवरुन त्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक शोधला जातो. संबंधिताना मेसेजही पाठविला जातो. नियमभंग तसेच दंडाची रक्कम मोबाइलवरही पाठवली जाते. पण, ही रक्‍कम वसूल होत नसल्याने तो आकडा 29 कोटी रुपयांवर पोहचला आहे. आता

‘हे’ नियम तोडणाऱ्यांना दंड
– सिग्नल तोडणे
– वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे
– झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे
– विरुद्ध दिशेने वाहन नेणे
– ट्रिपल सीट वाहन चालवणे

 

 

 

 

एकूण प्रकरणे – 10, 67, 034


एकूण दंड – 28 कोटी 77 लाख 74 हजार 121 रुपये

तत्कालीन वाहतूक उपायुक्‍तांची मोहीम
बेशिस्त वाहनचालकांकडे थकीत रक्कम वाढली असल्याने तत्कालीन वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे यांनी फेब्रुवारीत विशेष नाकाबंदीची मोहीम राबवून दंड वसूल केला होता. प्रत्येक विभागवार दोन तासांची नाकाबंदी करत 1 लाख 24 हजार 785 केसेस निकाली काढल्या. यातून 3 कोटी 9 लाख 1 हजार 815 रुपये दंड वसूल केला होता.

बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवत कारवाई तसेच दंडही वेळोवेळी वसूल केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून ई-मशीनमध्ये असलेल्या कार्डला नेटवर्क प्रॉब्लेम येत असून यासंदर्भात संबंधितांशी चर्चा झाली आहे. लवकरच सुधारणा करुन उर्वरित दंड वसूल केला जाईल.
– तेजस्वी सातपुते, वाहतूक उपायुक्त, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)