नवी दिल्ली – देशातील तब्बल 28,663 भारतीय अर्जदार एखादे मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले आणि दत्तक घेणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की 1,030 परदेशी अर्जदार (अनिवासी भारतीय आणि भारतातील परदेशी नागरिकांसह) दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहेत.
2021-22 मध्ये, देशात एकूण 2,991 दत्तक अर्जांची प्रक्रिया पुर्ण झाली आहे, त्यापैकी 414 जणांना देशाबाहेर दत्तक देण्यात आले आहे. सध्या 28 हजार 663 भारतीय अर्जदार देशात मूल दत्तक घेण्याची वाट पाहत आहेत असे स्मृती इराणी यांनी सांगितले.