पौड पोलिसांकडून 410 जणांवर कारवाई

पिरंगुट – विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पौड पोलीस ठाण्याच्या वतीने 410 जणांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करण्यात आली, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन अंतर्गत कलम 107 प्रमाणे 104 इसमांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून बॉंड लिहून घेण्यात आले आहेत. कलम 109 प्रमाणे 11 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कलम 110 प्रमाणे 40 इसमांवर कलम 149 प्रमाणे 141 इसमांना नोटीस देण्यात आले आहे. कलम 144 (2)(3) प्रमाणे 83 इसमावर निवडणुकीच्या काळात मुळशी तालुक्‍यातून हद्दपार करण्यात आले आहे. कलम 55 प्रमाणे 3 प्रस्ताव सादर करून 24 इसमावर हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. कलम 56(ब) प्रमाणे 4 सराईत इसमांविरोधात 4 हद्दपार प्रस्ताव पाठवले असून कलम 93 प्रमाणे 13 इसमावर प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे तसेच पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावर दारूबंदीसाठी छापे घालण्यात आले असून 36 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच सूचनांप्रमाणे पौड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, श्रीकांत जाधव, रेखा दुधभाते, पोलीस हवालदार संदीप सकपाळ, शंकर नवले, अब्दुल शेख, पोलीस नाईक संजय सुपे, विजय कांबळे, महिला पोलीस शिपाई तृप्ती भंडलकर या तपास पथकाने कामगिरी बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.