बारामतीत 41 किलो गांजा जप्त; 5 लाख 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बारामती – येथील भिगवण रस्त्यावरील टोलनाक्‍यावर एका मोटारीसह 41 किलो गांजा बारामती ग्रामीण पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 5 लाख 82 हजार इतकी आहे. मंगळवारी (दि. 18) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

नविनकुमार पांडू जाटू, किसन सैदा नाईक लावरी, राकेश धर्मा लावरी,(सर्व रा. हैद्राबाद) उमेश लक्ष्मण गायकवाड (रा. बीड) आणि अनिल राजू गायकवाड (रा. तांदुळवाडी वेस बारामती) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामती तालुका पोलिसांच्या हद्दीत एका मोटारी (टीएस 29, बी 9698) तून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भिगवण रस्त्यावर टोलनाक्‍यावर सापळा लावून ही मोटार ताब्यात घेतली असता पोलिसांना त्यात 41 किलो गांजा सापडला. बाजारात याची किंमत 82 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर यादव, निरीक्षक धन्यकुमार गोडसे, बारामती क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वनिल अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार, तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार सचिन पत्रे, पोलीस कर्मचारी ताकवणे, जाधव, मुळीक, चालक मोरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.