… आणी पोलीस आयुक्तांचे डोळे पाणावले

… आणी पोलीस आयुक्तांचे डोळे पाणावले
पुणे,दि.31- पुणे शहरातील कार्यकाळ माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला. येथील नागरिक व कर्मचारी सदैव माझ्या पाठिशी उभे राहिले. माझ्या वैयक्तीक दुखाच्या प्रसंगीही ते माझ्या पाठिशी उभे होते. माझ्या करकिर्दीत मी अनेक चांगले उपक्रम राबवले, त्यालाही नागरिकांचा तीतकाच चांगला प्रतिसाद दिला. सुदैवाने माझ्या कारकिर्दीत शहरात कोणतीची मोठी अनुचीत घटना घडली नाही. शहर सोडताना थोडी रुखरुख वाटत असली तरी निवृत्त झाल्यावर मी इथे रहायला येणार आहे.
रश्‍मी शुक्‍ला यांची अतिरीक्त महासंचालक (महामार्ग) पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी नापपूरचे पोलीस आयुक्त के.व्यंकटेश हे शुक्रवारी सूत्र स्विकारणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शुक्‍ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहरातील कार्य, नागरिकांचे प्रेम आणी इतर आठवणी सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले होते.

पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांची
रश्‍मी शुक्‍ला यांची पुण्यातील कामगिरी :
रश्‍मी शुक्‍ला या 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 31 मार्च 2016 रोजी पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली. अवैध धंद्याविरोधात मोहिम राबविली महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना तयार केल्या. त्यामध्ये आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी बडीकॉप, विद्यार्थ्यांसाठी पोलीस काका यासारखे उपक्रम सुरु केले स्मार्ट पोलिसिंग हा उपक्रमही त्यांनी राबविला. पुणे पोलीस दल अत्याधुनिक होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, तास हेल्पलाईन सुविधा असे उपक्रम राबविण्यात आले ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या कामगिरीबद्दल दिल्ली येथील संस्थेकडून उपक्रमांचा गौरव करण्यात आला त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये विविध गुन्ह्यांचा तपास पुर्ण करून जप्त केलेला तब्बल पाच कोटींचा मौल्यवान ऐवज नागरिकांना परत मिळवून देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस आयुक्तालयात अपगांसाठी रॅम्प नव्हता, ही बाब अपंगांच्या एका संघटनेच्या प्रतिनिधींनी शुक्‍ला यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्त पदाची सूत्रे सोडण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच त्यांनी आवर्जुन हा रॅम्प बांधून घेतला. या बद्दल अपंग बांधवांकडून त्यांचा मंगळवारी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. तर शहरातील नायजेरीय नागरिकांच्या मासिकाने त्यांच्यावर खास लेख लिहून त्यांच्या कारकिर्दीचे कौतूक केले. या दोन्ही बाबी आपल्यासाठी महत्वाच्या असल्याचे शुक्‍ला म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)