पीएमपीच्या 4 हजार फेऱ्या रद्द

1 हजार 374 पीएमपी बस दिवसभरात धावल्या


बसेसची तपासणी करून संचलनात सोडण्याच्या सूचना

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसच्या गुरुवारी नियोजित फेऱ्यांपैकी तब्बल 4 हजार 162 फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

प्रशासनाने दिवसभरात 21 हजार 636 फेऱ्यांचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात 17 हजार 464 फेऱ्या केलेल्या आहेत. तर, 1 हजार 684 नियोजित बसेसपैकी 1 हजार 374 बसेस धावल्या. पीएमपीने एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

संचलनात असलेल्या बसेसची तपासणी करूनच बस मार्गावर सोडण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना दिल्या होत्या. पीएमपीएमएल बस ब्रेकडाऊन झाल्यास कोंडीत भर पडत असल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असल्याचे प्रशासन विभाग प्रमुख सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.