Mouni Roy : नुकताच अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका असलेल्या धमाल कॅामेडी ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. वरुण धवनसोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. ट्रेलरमध्ये अभिनेत्री मौनी रॉय वरुण धवनच्या खोट्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. यावरुन सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून मौनी रॅायला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी मौनी रॅायच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोघांच्या वयात केवळ एका वर्षाचे अंतर आहे आणि अभिनेत्री वरुण धवनच्या खोट्या आईची भूमिका साकरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, वरुण यावर्षी ३९ वर्षांचा झाला आहे. मौनी ४० वर्षांची आहे. या दोघांमध्ये फक्त एका वर्षाचे वयाचे अंतर असल्याने मौनीने साकारलेली वरुण धवनच्या आईची भूमिका नेटकऱ्यांना पचवणे कठीण जात आहे. या कास्टिंगमुळे नेटकरी खूश नाहीत. त्यांना या पात्रासाठी मौनीची निवड खटकली आहे. यामुळेच सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. एकाने ट्विट केले, “मौनी रॉय वरुण धवनच्या आईची भूमिका साकारणार? काय विनोद आहे!” दुसऱ्याने लिहिले, “मौनी रॉय त्याच्या खोट्या आईची भूमिका साकारत आहे, हे खरे वाटत नाही.” आणखी एका नेटकऱ्याने गंमतीने लिहिले, “मौनी रॉयला आई बनवले आहे, इतर चित्रपटांच्या कथा यापेक्षा चांगल्या असतात.” काही दिवसांपूर्वी मौनी रॅाय आणि तिचा पती सूरज नंबियार यांच्यात घटस्फोट झाल्याची चर्चा खरी ठरली. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. चित्रपट प्रदर्शनाची तारीख डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात मनीष पॉल, चंकी पांडे, जिमी शेरगिल या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हेही वाचा : Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे ‘या’ स्टारकिडसोबत जोडलं नाव