दुग्ध व्यवसाय वाढीसाठी 40 पशुसेवकांनी घेतले विशेष प्रशिक्षण

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील 40 पशुसेवकांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) या संस्थेस भेट देऊन दुग्ध व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रशिक्षण घेतले.
मागील अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकट, पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे शेतीसह पशुधन धोक्‍यात आल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते.

हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने वाढविण्यासाठी कोपरगाव तालुक्‍यातील 40 पशुसेवकांनी राहुरी येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) या संस्थेला भेट दिली. यावेळी व्यवस्थापक पशुतज्ज्ञ डॉ. शिवकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जनार्दन कातकडे यांनी गाय व इतर जनावरांची कृत्रिम गर्भधारणा व गर्भरोपण याबद्दल मार्गदर्शन करून आधुनिक पद्धतीचे सिमेन्स कसे तयार होते, त्याची कशाप्रकारे हाताळणी करावी, साठवण कशा पध्दतीने करावे, बाबाबत सखोल माहिती देऊन दुग्ध व्यवसाय वाढीची सखोल माहिती दिली.

पशुतज्ज्ञ डॉ. संतोष कवाणे, खिलारी यांनीही सिमेनबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान, कोपरगाव येथून प्रशिक्षणासाठी गेलेल्या 40 पशुसेवकांना राहुरी सिमेन स्टेशन या संस्थेच्यावतीने अधिकृत प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास कोपरगाव तालुक्‍यातील डॉ. गिरमे, डॉ. करडक, डॉ. जमदाडे, डॉ. किसन दहे आदींसह 40 पशुसेवक उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे नियोजन अप्पासाहेब नवले यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.