पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शनिवारी प्लॅस्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल 40 व्यावसायिकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच कारवाईस विरोध करणाऱ्या रहाटणीतील एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कोकणे चौक व परिसरात प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा करणाऱ्यांवर, निगडी येथे पाच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.