फलटण (प्रतिनिधी)- तालुक्यात करोना पॉझिटिव्हचा धमाका झाला असून, आज सोमवारी पुन्हा 17 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये फलटण शहरातील 5 , खामगाव येथील 10 , साखरवाडी येथील 1 तर सासवड येथील 1 असा समावेश आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये फलटण तालुक्यातील 23 जण पॉझिटिव्ह आले होते तर आत्ताच आलेल्या अहवालानुसार आणखी 17 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या दिवसात एकूण 40 करोना रुग्ण आढळल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
लक्ष्मीनगर फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १९ वर्षांचा मुलगा, ४२, ४५ व ४९ वर्षांचे पुरुष व ४० वर्षांची महिला (एकूण ५) यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खामगाव ता. फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६२, २४, ५२, २५, २२, ७० व २६ वर्षीय पुरुष आणि ५५, ४५ व २० वर्षीय महिला (एकूण १०) यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मौजे साखरवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, मौजे सासवड येथील २४ वर्षीय अशा एकूण 17 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.