चिंताजनक ! भारतात अतिघातक ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे 40 रुग्ण

नवी दिल्ली – अतिघातक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे भारतात सुमारे 40 रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. हे रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेशात तुरळकपणे आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ही माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंट आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटला अतिघातक व्हेरिएंट म्हणून संबोधले जाते आहे.

आतापर्यंत देशभरात तपासल्या गेलेल्या 45 हजारापेक्षा अधिक नमुन्यांपैकी डेल्टा प्लस -एवाय.1 हा व्हेरिएंट महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेशात तुरळकपणे आढळला आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांची संख्या 40 आहे. त्यात अधिक वाढ झालेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या तीन राज्यांना संसर्गावर अधिक बारीक लक्ष ठेवणे आणि योग्य आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एवाय.1 बाबत इंग्लंडच्या आरोग्य विभागाचा पहिला अहवाल सर्वप्रथम 11 जून रोजी मिळाला होता. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये हा व्हेरिएंट महाराष्ट्रातील नमुन्यात मिळाला होता. हे नमुने 5 एप्रिल रोजी घेण्यात आले होते.

18 जूनपर्यंत जगभारात एवाय.1 प्रकारात 205 सिक्वेन्स सापडले आहेत. यातील निम्मी ज्ञात प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सापडली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.