स्तनाच्या कर्करोगासाठी करण्यात आलेल्या हेल्थकेअर तपासण्यांच्या आधारावर असे दिसून आले आहे की, राज्यात 40 टक्के महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढताना दिसून येतो आहे.
स्तनाच्या कर्करोगाविरोधात मोठे प्रयत्न जीवनशैलीमध्ये पुरेसे बदल करत करता येऊ शकतात. चाळीस वर्षांवरील महिलांसाठी सुरूवातीच्या टप्प्यामध्येच स्तनाचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी ही महत्त्वाची चाचणी करण्यावर भर देत आहोत.
महिलांनी नियमितपणे व वेळेवर तपासण्या करण्यासदेखील प्रोत्साहित करत आहोत.याव्यतिरिक्त महिलांना स्तनाचा कर्करोग होण्यास कारणीभूत धोकादायक घटकांबाबत माहिती करून घेण्यासाठी आनुवांशिक चाचणीबाबत कल्पना दिली जात आहे. म्हणून स्वयंचाचणी केल्यानंतर स्त्रियांनी कर्करोगतज्ञाला भेट द्यावी.
प्रत्येक 6 ते 8 महिन्यातून मंथली सेल्फ ब्रेस्ट चाचणी, क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी अशा तपासण्या कराव्यात. तसेच 35 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांनी वर्षातून एकदा सोनो मॅमोग्राफी, मॅमोग्राफी / ब्रेस्ट एमआरआय करावी.
चाळीस वर्षांवरील सर्व महिलांना वर्षातून एकदा मॅमोग्राफी करावी. लठ्ठपणा व उच्च बीएमआयचा वाढता धोका असलेल्या महिलांना वजनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आजाराचा धोका कमी करण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पोषण व फिटनेससंदर्भात काळजी घेणेही गरजेचे असेल.
अमोल नायकवडी