डुडुळगावात 40 लाखांचा गांजा जप्त

अंमलीपदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी – विक्रीसाठी आणलेला 40 लाख रुपयांचा 150 किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेतील पोलिसांनी सापळा लावून जप्त केला. मोशी-आळंदी रस्त्यावर डुडुळगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पेट्रोलिंग करत असताना चारचाकी वाहनातून विक्रीसाठी गांजा आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. संजय मोहन गरड (वय, 26 रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर), अमोल रामभाऊ आगळे (वय, 25 रा.कवठा, ता. नेवासा, जि. अहमदनगर), रामभाऊ घनश्‍याम आगळे (वय, 50 रा. कवठा, ता.नेवासा. जि. अहमदनगर)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी-आळंदी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना हवालदार प्रदीप शेलार यांना काही व्यक्‍ती विक्रीसाठी गांजा आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी सापळा लावून वाहनांची तपासणी करत असताना रस्त्यावर संशयितरित्या उभ्या असलेल्या फोर्ड फिएस्टा (एम.एच.14-.एम.6959) या चारचाकी वाहनात विक्रीसाठी आणलेला गांजा आढळून आला. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलिस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत महाले, पोलिस हवालदार प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, राजन महाडिक, शकुर तांबोळी, पोलिस नाईक दिनकर भुजबळ, संतोष दिघे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अशोक गारगोटे, शैलेश मगर, संतोष भालेराव यांनीन केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.