वीजचोरीसाठी न्यायालयाने ठोठावला ४० लाखांचा दंड 

ठाणे : वीज मीटरमध्ये फेरफार करून महाराष्ट्र वीज नियामक मंडळाला तब्ब्ल २० लाखांचा चुना लावणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील एका वर्कशॉप मालकास कोर्टाने चांगलाच इंगा दाखवला आहे. मीटरमध्ये सर्किट बसवून खलील अहमद नवबअली सुभेदार नामक या इसमाने मार्च २००९ ते नोव्हेंबर २०१० दरम्यान वापर केलेल्या विजेचा वापर लपवला होता. या कालावधीमध्ये त्याने २.१८ लाख युनिट विजेचा वापर केला असून वापरलेल्या विजेचा आकार २०.९१ लाख रुपये एवढा होतो.

२८ डिसेंबर २०१० रोजी महाराष्ट्र वीज नियामक मंडळाच्या एका पथकाने सुभेदारच्या वर्कशॉपवर धाड टाकली असता, वर्कशॉप मालक सुभेदाराने आपल्या विजेच्या मीटरमध्ये सर्किटद्वारे फेरफार करत वीज आकार चुकवण्याचा गुन्हा केल्याचे निदर्शनास आले. सुभेदार याच्यावर वीज कायद्याच्या कलम १३५ आणि कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.