नवी दिल्ली : देशातील 10 ते 17 वयोगटातील 40 लाख मुले अंमली पदार्थामचे सेवन करतात. तर याच वयोगटातील 30 लाख मुलांना दारू पिण्याची सवय आहे, असे सरकारने मंगळवारी सांगितले. सामाजिक न्याय मंत्री रतनलाल कटारिया यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
भांग आणि वेदनाशामके घेणाऱ्यांचे प्रमाण प्रत्येकी 20 लाख आहे. तर चार लाख मुले अम्फेटामाईन सारख्या नशा करतात. दोन लाख जण कोकेन आणि हल्लूकीनोजेनस्चे सेवन करतात. 18 ते 75 वयोगटातील 15 कोटी 10 लाख जण दारूच्या आहारी गेले आहेत. तर दोन कोटी 90 लाख जण भांग घेतात. तर सुमारे 50 लाख जण अंमली पदार्थामचे सेवनकरतात. 10 लाख जण कोकेने घेतात.
अंमली पदार्थांची मागणी कमी व्हावी म्हणून 2018 ते 25 या काळासाठी महत्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यामचे प्रबोधन, पालकांची चर्चासत्र, समुदाय भेट अशा योजनांचा त्यात समावेश आहे.