भुशी धरणाच्या धबधब्यात अडकलेल्या चार जणांची सुखरूप सुटका

लोणावळा – भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या जंगलातील एका मोठ्या धबधब्यात वरच्या बाजूला अडकून बसलेल्या चार तरुणांची सुखरूप सुटका करण्यात लोणावळा शहर पोलीस, व्यावसायिक आणि शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाला शनिवारी (दि. 5) यश मिळाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 4) दुपारी तीनच्या दरम्यान लोणावळा पोलीस ठाण्यामधून फोन आला की भुशी डॅमच्या वरील जंगलातील धबधब्यात पिंपरी मधील चार तरुण अडकले आहेत. ज्यांना खाली येता येत नाही. सकाळी पाऊस नसल्याने हे चारही तरुणवर गेले होते, मात्र दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने आणि धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढून दगड चिकट झाल्याने या तरुणांना परत खाली येता येत नव्हते. त्यामुळे या तरुणांनी पोलिसांना फोन केला. लोणावळा पोलीस ठाण्यावरून शिवदुर्ग मित्र बचाव पथकला संपर्क साधण्यात आला.

पोलीस ठाण्याचा “कॉल’ आल्यानंतर तात्काळ शिवदुर्गची टीम बचाव कामासाठी रवाना झाली. मात्र तत्पूर्वी लोणावळा पोलीस ठाण्यावरून पोलीस शिपाई गणपत होले, पवन कराड, राजू कोळी, होमगार्ड कोकाटे तसेच स्थानिक व्यावसायिक शशिकांत शिंदे, लक्ष्मण शेडगे, ओंकार चव्हाण, संतोष धोत्रे, विकास चव्हाण हे पुढे गेले. थोड्याच वेळात शिवदुर्ग टीमचे सुनील गायकवाड, आनंद गावडे, अनिल सुतार, शैलेश भोसले व साहेबराव चव्हाण हे देखील संबंधित तरुण अडकलेल्या जागेचा शोध घेत घटनास्थळी पोहचले.

त्यानंतर त्या ठिकाणी अडकलेल्या अभिषेक पूनम कुमार (वय 24), कुणाल किशोर चौधरी (वय 22), सलेह महम्मद (वय 22), अमर कुमार धर्मा (वय 24, सर्व रा. पिंपरी) यांना धीर देत धबधब्यातून खाली घेऊन पुढे ओढ्यातून व जंगलातून सुखरूप परत आणले गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)