गांधीनगर : गुजरातमध्ये कालपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबण्याचे काही नाव घेत नाही. त्यातच राज्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, वायनाडमध्ये शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE Gujarat: 4 dead after a 3-storey apartment building in Pragatinagar, Nadiad collapsed, late last night. Rescue operations underway. More details awaited. pic.twitter.com/yhZyw8PfJm
— ANI (@ANI) August 10, 2019
वायनाडमधील प्रगतीनगरची एक इमारत रात्री अचानक कोसळली. दरम्यान, या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असून पावसाचा जोरही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.