काश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

file photo

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी भारतीय सेनेतर्फे दहशतवाद्यांविरोधात एक मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सेनेने तीन शोधमोहिमा आखल्या होत्या.

दरम्यान, वृत्तसंथाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चार चकमकी झाल्या आहेत. यातच एक चकमक शोपिया जिल्ह्यातल्या इमाम भागात अजूनही सुरू आहे. या ठिकाणी एका घरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. तर बांदिपोरातल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अली भाईचा समावेश आहे. तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)