पुण्यात क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणार्‍या चौघांना अटक

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकांची कारवाई

पुणे – वर्ल्डकप दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड क्रिकेटच्या सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणार्‍या चौघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सिंहगड रोड परिसरातून जेरबंद केले आहे. यावेळी जुगार खेळणारे व घेणारे या सर्वाचा समावेश आहे.

सचिन वसंत चव्हण (वय-38,रा. सिंहगड रोड), अमोल भगवंत खळदकर (वय-50,रा. नारायण पेठ), राहूल गोरक्षणाथ जगताप (वय-38,रा.कोंढवा ब्रुद्रुक) व पृथ्वीराज शंकर येळवंडे (वय-38,रा. बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यावेळी या चौघांच्या ताब्यातून एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 10 हजार 940 रुपयांची रोकड असा 1 लाख 18 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना बातमीदारमार्फत बातमी मिळाली होती की, सिंहगड रोड परिसरातील दामोदरनगर हिंगणे खुर्द येथील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट सामन्या दरम्यान ऑनलाईन जुगार सुरू आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे, संजय गायकवाड, किरण अडागळे यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. यावेळी अटक करण्यात आलेले आरोपी ऑनलाइन जुगार खेळताना मिळून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.