चार धरणांत 4.22 टीएमसी पाणीसाठा जमा

तीन महिने पुरेल इतका साठा

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांत मिळून एकूण 4.22 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला तीन महिने पुरेल इतका आहे.

मागील आठ दिवसांपासून धरणांच्या क्षेत्रात चांगल्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे-नाले याद्वारे धरणांत पाणी जमा होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी खडकवासला धरणात 1 मिमी, पानशेतमध्ये 7 मिमी, वरसगावमध्ये 5 मिमी, टेमघरमध्ये 14 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरणात 0.60 टीएमसी, पानशेतमध्ये 2.85 टीएमसी, वरसगावमध्ये 1.33 टीएमसी आणि टेमघरमध्ये 0.03 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.