#INDvNZ 3rd T20 : न्यूझीलंड संघाने टाॅस जिंकला

हॅमिल्टन : भरात असलेल्या भारतीय संघाचा आज न्यूझीलंडशी तिसरा टी-20 सामना होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारताला आजच्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. या सामन्यातही नाणेफेक आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोन गोष्टी पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहेत.

भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या तिस-या टी-20 सामन्यास थोड्यात वेळात वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.

दरम्यान, न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची भारतीय संघाला प्रथमच संधी मिळणार आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००८-०९ व २०१९ साली अनुक्रमे २-० व २-१ अशी मालिका गमवावी लागली होती. त्याचा वचपा काढण्याची यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.