इंदूर :– रोहित शर्मा व शुभमन गिल यांची शतकी खेळी व त्यांना सुरेख साथ देताना कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर व यजुवेंद्र चहल यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने न्यूझीलंडवर 90 धावांनी विज मिळवला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने 3-0 असा निर्विवाद विजय प्राप्त करताना पाहुण्यांना व्हाइटवॉश दिला. शार्दुल ठाकूर सामन्याचा मानकरी ठरला.
Another comprehensive performance from #TeamIndia as they outclass New Zealand by 90 runs in Indore to complete a 3-0 whitewash. 🙌🏽
Scorecard ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/7IQZ3J2xfI
— BCCI (@BCCI) January 24, 2023
भारताने विजयासाठी दिलेल्या 386 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर संपला. डेव्हन कॉनवेची शतकी खेळी व्यर्थ ठरली. 138 धावांच्या या खेळीत त्याने 100 चेंडू खेळताना 12 चौकार व 8 षटकार अशी आतषबाजी केली. मात्र, त्याला समोरून तुल्यबळ साथ लाभली नाही.
हेनरी निकोल्स 42, डॅरेल मिशेल 24, मायकल ब्रेसवेल 36 तर मिचेल संटनरने 34 धावा करत निकराचे प्रयत्न केले. मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. भारताकडून शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. यजुवेंद्र चहलने 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्मधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्मा व सलामावीर शुभमन गिल यांनी आक्रंमक फलंदाजी करत लॅथमचा निर्णय साफ चुकीचा ठरवला. या जोडीने न्यूझीलंडच्या संमिश्र गोलंदाजीची वाताहत केली. या दोघंनी संघाचे शतक तसेच द्विशतकही फलकावर लावले. तसेच अर्धशतकी पल्ला पार करताना आपापली शतकेही साकारकेली. त्यानंतर मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाले.
#INDvNZ 3RD ODI : रोहित-शुभमनची शतकं, Team India चे न्यूझीलंडसमोर विशाल आव्हान
रोहितने आपल्या 101 धावा करताना 85 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 6 षटकार फटकावले. गिलनेबी 112 धावांची खेळी करताना 78 चेंडूत 13 चौकार व 5 षटकार फटकावले. त्यानंतर विराट कोहलीने थोडी चमक दाखवली मात्र, स्थिरावल्यावरही तो अनावश्यक फटका मारुन 36 धावांवर बाद झाला. इशान किशन 14, सूर्यकुमार यादव 14, वॉशिंग्टन सुंदर 9 यांनीही निराशा केली. मात्र, त्याचवेळी हार्दिक पंड्याने शार्दुल ठाकूरला साथीला घेत संघाला त्रिशतकही धावांपेक्षाही जास्त मोठी मजल मारून दिली.
शार्दुलने 25 धावांच्या खेळीत 17 चेंडूत 3 चौकार व 1षटकार फटकावला. पंड्याने 54 धावांच्या खेळीत 38 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 3 षटकार फटकावले. भारताने 50 षटकात 9 बाद 385 धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून ब्लेअर टीकनर व जेकब डफी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले
संक्षिप्त धावफलक –
भारत :- 50 षटकांत 9 बाद 385 धावा. (शुणबन गिल 112, रोहित शर्मा 101, हार्दिक पंड्या 54, विराट कोहली 36, शार्दुल ठाकूर 25, ब्लेअर टीकनर 3-76, जेकब डफी 3-100).
न्यूझीलंड – 41.2 षटकांत सर्वबाद 295 धावा. (डेव्हव कॉनवे 138, हेनरी निकोल्स 42, डॅरेल मिशेल 24, मायकल ब्रेसवेल 36, मिचेल संटनर 34, शार्दुल ठाकूर 3-57, कुलदीप यादव 3-62, यजुवेंद्र चहल 2-43).