लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी 3971 कोटींचे कर्ज; सर्वाधिक वाटा तामिळनाडुला

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी मंत्रालयाने देशातील लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी 3 हजार 971 कोटी रूपयांचे सवलतीच्या व्याज दराचे कर्ज मंजुर केले आहे. यातील सर्वाधिक वाटा तामिळनाडुला मंजूर झाला आहे. या कर्जाच्या व्याजाला नाबार्ड कडून सवलत दिली जाणार आहे.

लघु पाटबंधारे प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी या क्षेत्राला सन 2019-20 या काळात पाच हजार कोटी रूपयांचा एक स्वतंत्र निधी उभारण्यात आला होता. त्यातून हे 3 हजार 971 कोटी रूपयांचे कर्ज विविध प्रकल्पांना मंजुर करण्यात आले आहे.

त्यातील 1357 कोटी रूपये तामिळनाडुला मिळणार आहेत. हरियानाला 790 कोटी 94 लाखांचे, गुजरातला 764 कोटी 13 लाखांचे, आंध्रप्रदेशला 276 कोटी 55 लाखांचे, पंजाबला 150 कोटींचे, आणि उत्तराखंडला 15 कोटी 63 लाखांचे कर्ज मंजुर झाले आहे. यातील 1754 कोटी 60 लाख रूपयांची कर्ज रक्कम प्रत्यक्षात वितरीतही करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.