3966 कोटी रुपयांच्या लखवाड प्रकल्पाबाबत 6 राज्यांत समझोता

नवी दिल्ली – यमुनेच्या खोऱ्यातील 3966 कोटी रुपयांच्या बहुउद्देशी लखवाड प्रकल्पावर सहा राज्यात सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. या प्रसंगी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

लखवाड योजनेअंतर्गत उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यातील लोहारी गावाजवळ यमुनेवर धरण बांधण्यात येणार आहे. 330.66 एमसीएम क्षमतेचे हे धरण 204 मीटर्स उंचीचे असणार आहे. यामुळे 33,780 हेक्‍टर भूमीचे सिंचन होणार आहे. सहा राज्यांना घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी 78.83 एमसी पाणी उपलब्ध होणार आहे. आणि 300 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकल्पासाठीच्या खर्चापैकी 10 टक्के खर्च राज्यांनी आणि 90 टक्के खर्च केंद्राने करायचा आहे. 1994 साली या प्रकल्पासाठी 5 राज्यांत समझोता झालेला होता, मात्र नितीन गडकरींच्या प्रयत्नाने आता सहा राज्यांमध्ये सहमती झाली आहे.

गेली 42 वर्षे अडकून पडलेला हा प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

हिमालयाच्या खोऱ्यात पाण्याची कमतरता नाही, पण त्याच्या नियोजनाची कमतरता आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या आणि शेतीसाठी पाण्याची पूर्ती होणार आहे, जलप्रदूषण कमी होणार आहे, आणि वीजनिर्मिती होणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)